अकोला : कुणबी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. जि. प सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष वामनराव मानकर होते. उदघाटन आमदार आकाश पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, सागर पुंडकर, गुलाबराव महल्ले खामगाव, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जगन्नाथ डांगे नांदुरा, जगन्नाथ खरप पातूर, माजी आमदार ज्ञानदेव राव ठाकरे, अनंतराव भारसाकळे नागपूर, पंचायत समितीच्या उपसभापती हेमाताई लोळ, माजी अध्यक्ष विठ्ठलराव लोथे, केदार ढोरे नांदुरा, राजाराम काळने खामगाव, वाल्मिकराव ठाकरे, श्रीकांत ढगेकर, अरुण भगत बुलढाणा, प्रदीप वानखेडे, जी. प सदस्य चंद्रशेकर पांडे गुरुजी, ऍड.विनोद फाटे, विश्वनाथ तिडके सोनाळा, केशवराव टोहरे, पुरुषोत्तम दातकर, लक्ष्मणराव काळने खामगाव जि प सभापती वासुदेव राव टिकार, प्रकाश शेगोकार, शांताराम पोपटखेडे उपस्थित होते. सुरवातीला संत शिरोमणी संत तुकाराम महाराज्यांच्या प्रतिमेचे भूमिपूजन करण्यात आले. दिवंगत कृषिमंत्री भाऊसाहेब पुंडकर, स्व विद्याधर तिडके याना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय भोयर यांनी केले. या युवक-युवती परिचय मेळाव्यासाठी ७२० बायोडाटा प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. ऍड संतोष भोरे, श्रीकांत ढोरे, विजयराव कोकाटे, रामदास शेळके, ज्ञानदेवराव ठाकरे, राजाभाऊ फाटे, चंद्रशेखर फाटे, लभडे यांनी सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
संभाजी आनंदराव काळे, यांनी विद्यार्थिनीचे प्राण वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबाबत राज्य पुरस्कार प्राप्त प्रमोद फाळके, राजू फाटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार आकाश पुंडकर, अनंतराव भारसाकळे, यांनी मोगत व्यक्त केले. आमदार संजय कुटे यांच्याकडूनही शुभेच्छा संदेश प्राप्त झाला होता.
या युवक-युवती परिचय मेळाव्यात वामनराव मानकर यांनी अध्यक्षीक भाषणात भविष्यात सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला समाज बांधवांची चांगली उपस्थिती होती.
अधिक वाचा : अकोला महानगरपालिका मध्ये लोकशाही संपली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola