• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

जावई व साळ्याने केले युवतीचे लैंगिक शोषण; बलात्काराचा गुन्हा दाखल

adil by adil
May 19, 2020
in गुन्हा, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
Rape
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (शब्बीर खान) : जावई व साळ्याने संगनमताने एका १८ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केल्याची घटना सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युवतीने रविवारी तक्रार दिल्यानंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एका वकिलाने पक्षकार महिलेवरही अत्याचार केल्याचे प्रकरण शनिवारी घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका युवतीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खेर्डा येथील रहिवासी नागेश देवीदास चिमणकर याच्या बहिणीचा विवाह अकोल्यातील रहिवासी नीलेश शंकर बोरकर याच्याशी झाला होता. या विवाहानंतर नागेश चिमणकर अकोल्यात येत असल्यामुळे त्याची बहिणीच्या माध्यमातून पीडित युवतीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अशातच नागेशने पीडित युवतीला बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगून बोलावले, त्यानंतर युवती नागेशच्या बहिणीच्या घरी आली असता तिथे कुणीही उपस्थित नव्हते. याचवेळी नागेश चिमणकर याने युवतीवर बलात्कार केला, त्यानंतर युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैंगिक शोषण सुरू केले.शेगाव येथे नेऊनही तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलमध्ये असलेल्या अश्लील छायाचित्रांची धमकी देऊन त्याने युवतीचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले.दरम्यान, त्याने युवतीला लग्न करण्याचेही आमिष दिले; मात्र विवाह न केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले.

या वादातच युवतीचे अश्लील छायाचित्र नागेशकडे असल्याची माहिती त्याचा जावई नीलेश बोरकर यांना मिळाली. त्यानेही युवतीला छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण सुरू केले. साळा व जावई दोघांनीही पीडित युवतीचे एक ते दीड वर्ष लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी साळा व जावई दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अधिक वाचा : तरुण प्रेयसीवर प्राणघातक हल्ला करून ५० वर्षीय प्रियकराची आत्महत्या

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

तरुण प्रेयसीवर प्राणघातक हल्ला करून ५० वर्षीय प्रियकराची आत्महत्या

Next Post

‘दीपवीर’ वर शीख समुदाय नाराज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
दीपवीर

'दीपवीर' वर शीख समुदाय नाराज

वर्धा

महाराष्ट्र : पुलगावमध्ये सेनेच्या डेपोमध्ये भीषण स्पोट,चार कर्मचारी मृत

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.