अकोला (शब्बीर खान) : पळवून नेलेली प्रेयसी माहेरी परत आल्यामुळे संतापलेल्या ५० वर्षीय प्रियकराने तीच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्यानंतर स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना पातूर तालुक्यातील विवरा शेतशिवारात सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी घडली. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तीच्यावर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या विवरा येथील १८ वर्षीय तरुणीला खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथील नियामत खाँ सुजात खाँ (५०)याने गेल्या सात महिन्यापुर्वी पळवुन नेले होते. त्याच्यासोबत काही महिने राहिल्यानंतर सदर तरुणी महिनाभरापूर्वी तीच्या आई-वडीलांकडे विवरा येथे परत आली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी सदर तरुणी ही तीची आई व बहिणीसोबत स्वत:च्या शेतात कापूस वेचणीसाठी गेली असता, तेथे नियामत खाँ सुजात खाँ पोहचला. यावेळी त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने तरुणीवर सपासप वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी होऊन खाली पडली.
हल्ला केल्यानंतर नियामत खाँ हा पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारच्या शेतातील लोकांनी आरडाओरड करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिथरलेल्या नियामत खाँ याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी .सी खंडेराव, चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे उपनिरीक्षक जयसिंग पाटील व बाळापुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. चान्नी व पातुर पोलिसांनी नियामत खाँ चा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. सदर वृत्तलिहिस्तोवर पोलिसांची कारवाई सुरु होती.
अधिक वाचा : चोरीतील आरोपींना दोन वर्षांचा सश्रम कारावास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola