सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेच्या ठिकाणी विरोधी पक्षांनी ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या पोस्टरची नक्कल करत महाराष्ट्र सरकारला ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ची उपमा दिली आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ठगांच्या रुपात दाखवण्यात आले आहे.
या पोस्टरवर आमीर खानच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले आहेत. ‘ठग ऑफ महाराष्ट, ठगबाजीची चार वर्षे’ असे या पोस्टरखाली लिहिले आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या चार वर्षांच्या कार्यकाळाला विरोधकांनी ठगबाजीची चार वर्षे असे संबोधले आहे. जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, बेरोजगारांशी ठगबाजी अशी विविध शीर्षके देऊन सरकारने पूर्ण न केलेल्या आश्वासनांची यादी या खाली दिली आहे.
अधिक वाचा : मराठा समाजाला आरक्षणाबाबतच्या शिफारशी राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola