तेल्हारा (प्रतिनिधी): विदर्भ कबड्डी असोसिएशन चे पदाधिकारी राजुभाऊ पिसे वर्धा व बाबाराव आगलावे चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच जिल्हा कबड्डी महासंघाची बैठक संपन्न झाली गाव तेथे कबड्डी मंडळ स्थापन करणे व जिल्ह्यातील प्रामाणिक खेळाडूंना न्याय मिळवून देन्याच्या उद्देशाने क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी राणेगाव संघाचे अॅड अरूण कुकडे यांची अध्यक्षस्थानी तर बेलखेड च्या दर्यावर्ती संघाचे माजी खेळाडू पत्रकार सत्यशील सावरकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली. त्याची निवड कबड्डी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष म न पा नगरसेवक मंगेश काळे व जिल्हा कार्यकारिणी मंडळाने केली आहे.