तेल्हारा(प्रतिनिधी)- सततची नापिकी त्यामुळे वाढलेले कर्ज पावसाच्या अनियमितपणा मुळे उत्पादनात झालेली घट शेतमालाला भेटत असलेले कवडीमोल भावामुळे काही शेतकरी हवालदिल झाल्यामुळे आत्महत्या करीत आहेत आपल्या कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे आपल्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे आपल्या दुःखात शिवसेना शामिल असून शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपले मनोबल खचू देऊ नका या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने आत्महत्याग्रस्त कुटुंबास शिवसेना पक्षामार्फत दिवाळी व भाऊबीज निमित्त जीवनआवश्यक वस्तू व साडीचोळी शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या शुभहस्ते संपर्कप्रमुख खा.अरविंदजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १९-११ सोमवार रोजी दुपारी १ वाजता प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे भेट देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास आत्महत्याग्रस्त कुटुंबांनी उपस्थित राहून जीवनावश्यक वस्तू व साडीचोळी स्वीकारावी ही विनंती.आत्महत्याग्रस्त कुटुंबांना घरून कार्यक्रम स्थळापर्यंत व पुन्हा कार्यक्रमस्थळं ते घरापर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी अकोला शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी सर्वं तालुक्यातील तालुकाप्रमुख व पदाधिकारी यांना प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कार्यक्रमाची संपुर्ण माहिती सविस्तर पत्राद्वारे द्यावी अशे कळविले आहे.जिल्हाप्रमुख यांच्या सांगितल्याप्रमाणे तेल्हारा तालुकाप्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या उपस्थितीत संजय अढाऊ अजय गावंडे विठ्ठलराव जोशी सर्कल प्रमुख गणेश तिव्हणे ता.प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांच्यासह तेल्हारा तालुका व शहरातील पदाधिकऱ्यांनि आत्महत्याग्रस्त 15 गावातील कुटुंबांना भेट देऊन पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली व कार्यक्रमस्थळी पोहोचवून घरापर्यंत पोहचवण्याची जवाबदारी पार पडत आहे.