रक्ताचं पाणी करून पिकलेल्या टोमॅटो ला भावच नसल्यानं शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटोच्या शेतात चक्क गुरं सोडलीत. नशिक जिल्ह्यातल्या गिरणारे गावातली ही घटना आहे. शेतातून टोमॅटो तोडून तो बाजारपेठेत नेल्यानंतर हातात पडणाऱ्या पैशातून किमान वाहतूक खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो बाजारात न्यायचाच कशाला असा शेतकरी विचार करतोय.
गिरणारे ही टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. इथून देशभरात माल निर्यात होतो. मात्र उच्च प्रतिच्या टोमॅटोच्या एका किलोला 2 रूपये तर मध्यम प्रतिच्या टॉमॅटोला 1 रूपया भाव मिळत असल्याने आता करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.भारतातून पाकिस्तान आणि बांगला देशाला मोठ्या प्रमाणावर टोमॅटो निर्यात केले जातो. मात्र या दोनही देशांच्या सीमेवर तणाव असल्याने ही निर्यात सध्या बंद आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून मातीमोल भाव आल्यानं भरल्या शेतात गुरं सोडायचे नाहीत तर काय करायचं हा शेतकऱ्यांचा सरकारला सवाल आहे.
अधिक वाचा : बुलढाण्यात कर्जबाजारीपणातून शेतकरी महिलेची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola