अकोला (प्रतिनिधी) : अकोला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज या वर्षी फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. कितीही दबाब आणला तरी एकही अर्ज अाॅफलाइन स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अकाेल्यातील विकासकामांचा अाढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी साेमवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी शासनाने ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू केले आहे. परंतु गतवर्षी हे पोर्टल काही तांत्रिक कारणामुळे पूर्णत: सुरूच होऊ शकले नाही. शेवटी महाडीबीटीऐवजी त्यापूर्वीचे ‘महाइस्कॉल’ पोर्टलवरच अर्ज करण्याचे अावाहन करण्यात अाले. परंतु काही कारणामुळे लाभार्थींना तेही करणे शक्य झाले नसल्यामुळे राज्य सरकारने अाॅफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला हाेता. या वर्षी मात्र महाडीबीटीत दोष िशल्लक न राहिल्यामुळे हे अर्ज ऑनलाइनच भरले जावेत, असे अावाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करताना महाविद्यालये आणि संबंधित कार्यालयांकडून विलंब केला जातो. त्यामुळे ऐनवेळी अर्ज ऑफलाइन स्वीकारावे लागतात. या वर्षी असे काहीही होऊ देऊ नका. महाविद्यालयांना वरचेवर पत्र लिहा आणि विशेष म्हणजे त्या पत्रांचे रेकॉर्ड ठेवून योग्य ती कारवाई करता येईल, अशी स्थिती निर्माण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अधिक वाचा : मुख्यमंत्री यांच्याकडून अकोट तालुक्यातील पुर्नवसित गावांना अनोखी भेट
अधिक वाचा : भारिप बमसं अकोट तालुकाच्या वतीने बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola