अकोला (शब्बीर खान) : अकोला प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी मंगळवार, १३ नोव्हेंबर रोजी चोरीच्या खटल्यातील अरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, वर्ष २०१० मध्ये सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात शंकर रामदास अतकरे यांनी तक्रार दिली होती.
त्यानुसार, शेत सर्व्हे क्रमांक ३१ मधील विहिरीत पाण्यासाठी लावण्यात आलेल्या केबलमधील अॅल्युमिनियमची तार एक अज्ञात व्यक्ती काढत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी भाऊ बाळू श्रीकृष्ण अतकरे यांना घेऊन शेत गाठले. त्या ठिकाणी त्यांना हरिभाऊ भोनाजी काळबागे कुºहाडीच्या साहाय्याने तार तोडत असल्याचे निदर्शनास आले.
दोन्ही भावंडांनी आरोपीला पकडून सिव्हिल लाइन पोलिसांच्या हवाली केले. अतकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तपासाअंती पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायाधीश ए. बी. रेडकर यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे न्यायालयात पाच साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला चार महिन्यांची शिक्षा होईल.
अधिक वाचा : वरली अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola