बार्शीटाकळी : नवीन वर्षात बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली असून, नेते, अभिनेते आणि नामवंत या स्पर्धेला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मधुकर पवार यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. श्री मधुकर पवार क्रीडा व बहूद्देशीय मंडळ यांच्यावतीने २४, २५, २६ आणि २७ जानेवारी २०१९ यादरम्यान गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथील प्रांगणावर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
देशातील १७ राज्यांतील नामवंत कबड्डी चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून, पुरुषांच्या २४ आणि महिलांचे १६ कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेले केळीवेळी हे गाव ज्या जिल्ह्यात आहे, त्याच अकोला जिल्ह्याला अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजनाचा मान दुसऱ्यांदा आणि बार्शीटाकळी या अविकसित तालुक्याला प्रथमच मिळाला असून, आयोजन दिमाखदार आणि भव्य-दिव्य होऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नेते, अभिनेते आणि प्रख्यात व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. मधुकर पवार यावेळी म्हणाले.
स्पर्धा नीटनेटक्या आणि शिस्तबद्ध व्हाव्यात, यासाठी आयोजन समितीने २० विविध समित्या तयार केल्या असून, गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शीटाकळी येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या स्पर्धेतील विजेते आणि उत्कृष्ट कबड्डीपटू यांच्यावर बक्षिसांची लयलूट होणार आहे. प्रथम येणाºया पुरुष व महिला संघाला १ लाख ५१ हजार रुपये रोख आणि शील्ड, द्वितीय संघाला ७१ हजार रोख आणि शील्ड, तर तृतीय संघाला ५१ हजार आणि शील्ड देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड अशी वैयक्तिक बक्षिसे पुरुष आणि महिला संघातील खेळाडूंना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, आयोजन समितीचे खजीनदार प्रा. डॉ. संतोष हुशे, आयोजन समितीचे सचिव डॉ. मुकुंदराव खुपासे, उमाकांत कवडे, रामभाऊ अहिर, बंडू खुमकर, नरेश रणधीर, रवी सुरोसे व सय्यद मकसुद उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा वयोवृद्ध आरोपी गजाआड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola