ज्येष्ठ कॉमिक लेखक स्टॅन ली यांचे लॉस एन्जेलिस येथे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. लॉस एन्जेलिस येथील Cedars-Sinai Medical Center येथे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त त्याच्या मुलीकडून देण्यात आले. त्यांच्या निधनाचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
लेखक, संपादक, प्रकाशक आणि एक अद्वितीय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. ‘स्पायडर मॅन’, ‘एक्स मॅन’, ‘द फँटास्टिक फोर’, ‘आयरन मॅन’, ‘ब्लॅक पँथर’, ‘हल्क’ आणि ‘अॅव्हेंजर्स’ यांसारखी पात्र ही स्टॅन ली यांच्याच कल्पनाशक्तीतून साकारण्यात आली होती.विसाव्या शतकात कॉमिक या संकल्पनेला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यास कोणी जबाबबदार असेल तर ते म्हणजे एक नाव. ते नाव आहे, ज्येष्ठ कॉमिक लेखक स्टॅन ली यांचं. १९६१ मध्ये त्यांनी फँटास्टिक फोरसह मार्व्हल कॉमिक्सची सुरुवात केली होती. ज्यानंतर हा प्रवास सुरु झाला त्याने कधी थांबण्याचं नावच घेतलं नाही.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola