बुलडाणा : भाऊबीज आटपून आपल्या घरी परतत असलेल्या कुटुंबाचा अपघात झाला आहे. देऊळगावराजा-चिखली मार्गावर कुंभारी इथं झालेल्या अपघातात पती-पत्नीसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
मुख्यदल असं आडनाव असलेलं कुटुंब भाऊबीज साजरी करण्यासाठी शेजारच्या गावाला गेलं होतं. तिथे भाऊबिजेचा कार्यक्रम आटपून मुख्यदल पती-पत्नी काल संध्याकाळी (रविवार) आपल्या लहान मुलासह मोटरसायकलवरून घरी परतत होते. तेव्हा कुंभारी इथं मुख्यदल यांच्या मोटारसायकलला चार चाकी मेटॅडोर वाहनानं जोरदार धडक दिली.
यामुळे झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार मुख्यदल कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला. अपघातात पती-पत्नी आणि मुलगा या मुख्यदल कुटुंबातील तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यदल यांना अजून दोन मुलं आहेत. अपघातात आईवडील गेल्याने मुख्यदल कुटुंबातील ही दोन चिमुकली पोरकी झाली आहेत. मुख्यदल कुटुंब मूळचं उमरखेड या गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उमरखेड गावावर शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मोटारसायकलला धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या ड्रायव्हरचा पोलीस आता शोध घेत आहेत.
अधिक वाचा : डिजीटल महाराष्ट्रचा कणा असलेल्या संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola