अकोट – नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अट्टल चोराला अटक करण्यात आली. शनिवारी १० नोव्हेंबरला सकाळी एक चोरटा अकोट शहरातील नया प्रेस भागातील विजेंद्र रामराव काकडे यांच्या घरात शिरला. आवाजामुळे घरात झोपलेल्या दोन तरुणी जाग्या झाल्या. त्यांनी आरडाओरड केली असता चोर पळायला लागला, परंतु त्यांनी पाठलाग केल्याने चोर नाली मध्ये पडला, त्या दोघी त्याच्यावर तुटून पडल्या, त्यांनी त्याची कॉलर व हात पकडली. त्यांच्या आवाजाने विजेंद्र काकडे धावून आले, त्यांनी पोलिस स्टेशनला फोन केला. अवघ्या पाच मिनिटातच त्या भागात गस्तीवर असलेले अकोट शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी वीरेंद्र लाड, गोपाल बुंदे तेथे पोहोचले. बाजूचे नागरिक आकाश बांकुवले, रामा देवरे, सुनील ठाकरे हे सुद्धा पोहोचले सर्वांनी त्याला पोलिस स्टेशनला आणले, त्याची झडती घेतली तेव्हा त्याचे जवळ सोन्या चांदीचे किरकोळ दागिने व नगदी ८२३ रुपये मिळाले.
रवींद्र काकडे यांनी दिलेल्या चोरीच्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेली व्यक्ती अजाबराव सखाराम गवई राहणार उरळ असे सांगितले. तपासामध्ये निष्पन्न झाले की सदर चोराने विजेंद्र काकडे यांच्या घरा शेजारी राहणारे विलास जनार्दन खारोळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. दोन्ही घर मिळून सोन्या चांदीचे किरकोळ दागिने व नगदी ८२३ रुपये असा एकूण १८ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल घरफोड्या कडून जप्त करण्यात आला. दोन धाडसी तरुण मुली व नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका घरफोड्याला अटक झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे, या दोन्ही तरुण मुलींचा पोलिस निरीक्षक गजानन शेळके सत्कार करणार आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांचे मार्गदर्शना खाली हेड कॉन्स्टेबल सारंगधर भारसाकळे, पोलिस कर्मचारी सचिन सोनटक्के,वीरेंद्र लाड,गोपाल बुंदे, सुनील नागे हे करीत आहेत.
अधिक वाचा : अकोट शहर पोलिसांनी वसुबारस च्या दिवशी दिले दोन गायींना जीवदान
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola