केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतेच लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी शोक व्यक्त करताना म्हणाले की, अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी आपल्या युवा काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.
Ananth Kumar Ji was an able administrator, who handled many ministerial portfolios and was a great asset to the BJP organisation. He worked hard to strengthen the Party in Karnataka, particularly in Bengaluru and surrounding areas. He was always accessible to his constituents.
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2018
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola