तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुका युवासेना तालुकाध्यक्ष जयवंत चिकटे यांनी पुण्यामध्ये एका हॉटेल मध्ये दि २४ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती.जयवंत चिकटे यांच्या आत्महत्या प्रकरणी चिकटे यांच्या आईने पुणे येथे फिर्याद दाखल करून वाशीम जिल्ह्यातील एका युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगाव बाजार येथील रहिवासी तेल्हारा तालुका युवासेनेचे तालुकाध्यक्ष जयवंत चिकटे यांनी २४ ऑक्टोबर रोजी पुणे येथील एका हॉटेल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जयवंत चिकटे यांच्या आईने पुणे येथील पोलिसात तक्रार दाखल केली असून माझा मुलाला लग्नाचे आमिष दाखवून लग्न करण्यास नकार दिल्याने आत्महत्या केल्याची तक्रारीत म्हटले आहे.दिलेल्या तक्रारी वरून पुणे पोलिसांनी वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खेर्ड येथील एका युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर युवती माझा मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असून सदर युवतीविरुद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola