चंद्रपूर : नागभीड़ पोलीस ठण्याचे प्रभारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना अवैधरित्या दारू वाहून नेणाऱ्या स्कार्पियोने धडक दिली आहे. या धडकेत छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रपुर जिल्हयात दारुबंदी असल्याने अवैध दारुचा पुरवठा रोखण्यासाठी आज विशेष अभियान सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. धडक दिल्यानंतर ही दारू वाहून नेणारी स्कार्पियो घेऊन आरोपी फरार झाले आहेत. आज (मंगळवार) सकाळची ही घटना आहे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिड़े हे पवनी मौशी गावाजवळ नाकाबंदी करत आपले कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी स्कॉर्पियो गाडीतून दारू घेऊन जाणाऱ्या आरोपींना चिडे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी पोलिसांना न जुमानता उपनिरीक्षक चिडे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या छत्रपती चिडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, चंद्रपुरात दारूबंदी असतानाही अनेक ठिकाणी अवैधरित्या दारू वाहतूक होत असते. यालाच आळा घालण्यासाठी पोलिसांकडून एक विशेष अभियान राबवण्यात येत आहे. परंतु या अभियानादरम्यानच पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांना धडक देण्यापर्यंत मजल गेलेल्या दारूमाफियांमना रोखायचे कसे, हे येणाऱ्या काळात पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे.
अधिक वाचा : २०१९ च्या निवडणुकांच्या सर्वे नुसार महाराष्ट्राचे सक्षम नेते म्हणून पहिली पसंती देवेंद्र फडणवीस
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola