मूर्तीजापुर (प्रकाश श्रीवास): शहर आणि जिल्ह्यातील रग्णांच्या से्वेसाठी अति आवश्यक वातानुकूलित व अत्याधुनिक यंत्रणाने सुसज्ज अश्या रूग्णवाहीकेचा लोकापर्ण सोहळा आमदार हरीष मारोती आप्पा पिंपळे यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आला. रोहा डायकेस प्रा.लि.यांच्या वतीने ही रूग्णवाहीका संत गजानन महाराज बहूउदेशीय संस्था र.नं.ए.एफ.१७८६५ या संस्थेला दि.३० आँकटोबर रोजी नगर परिषद प्रांगणात एक कार्यक्रम आयोजित करून श्रीकृष्ण मथुरालाल भुतडा यांनी प्रदान केली आहे. आयोजित लोकापर्ण सोहळ्याच्या अध्यक्षा नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षा आलिया तब्बसुम नासीरोददीन हया होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून रोहा डायकेस प्रा.लि.चे.श्रीकृष्ण मथुरालाल भुतडा,उधोजक कैलाशचंद्र अग्रवाल, श्रीधरन गोपालन,मुख्याधिकारी विजय लोहकरे, आरोग्य सभापती लाला डाबेराव यांची उपस्थितीती होती. सीएसआर फंडातून ही रूग्णवाहीका संत गजानन महाराज बहु.संस्थेला उधोजक कैलास अग्रवाल यांच्या मागणी व नेतृत्वाखाली आमदार हरीष पिंपळेसंस्था अध्यक्ष यांना गाडीच्या चाव्या देवुन प्रदान करण्यात आली. २० लक्ष रूपये किमंतीची ही रूग्णवाहीका ही आज जनतेच्या सेवेत रूजू झाली आहे. आता शहर व तालुका आणि जिल्ह्यातील रूग्णाला नागपूर, पुणे, मुंबई, हैदराबाद येथे उपचारासाठी जाणेसाठी सोईचे होणार असल्याचे प्रतिपादन आ.पिंपळे यांनी केले आहे.ही रूग्णवाहीका रूग्णांच्या सेवेसाठी सहज उपलब्ध होणार असून याकरिता संत गजानन महाराज बहु.संस्थेचे सुनील लशुवाणी, संतोष भांडे,योगेश फुरसुले, डॉ. गोसावी, नुतन हरीष पिंपळे, प्रशांत हजारी प्रयत्नशील आहेत. आयोजित रूग्णवाहीकेच्या लोकापर्ण सोहळ्याला नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक विनायक गुल्हाने, ममता कैलाश महाजण, भारत जेठवाणी, शिक्षण सभापती सुनील पवार,वैभव यादव,समाजसेवक कमलाकर गावंडे, नगरसेवक तस्लीमखाँ बिसमिल्हाखाँ,सचिन देशमुख, आशीष बरे,धनश्री शैलेश भेलोंडे, रवींद्र इंगळे, अनिसाबी शेख खलील, सरीता राहुल पाटील, स्नेहा गजानन नाकट, मंदाताई जळमकर, लक्षमी देविदास गोळे, सुनिता गुल्हाने, अफरोजाबी अ.कलाम,मनुबाई तानकर प्रतिक्षा वसुकार व भाजपाचे सतिशचंद्र शर्मा, चंद्रकांत तिवारी, स्वीकृत नगरसेवक संजय डागा, सुधीर दुबे, संतोष भांडे,राजु हांडे, छत्रपती साबळे, अँड. अविन अग्रवाल, राजु सदार,मुन्ना श्रीवास, राजु गुल्हाने, योगेश फुरसुले, आरीफभाई,आदीची उपस्थितीती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रकल्प प्रमुख राजेश भुगुल यांनी केले. यशस्वीतेसाठी नगर परिषद कर्मचारी व भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.