अंबरनाथ : अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसीत एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की परिसरात त्याचे धुराचे लोट पसरले आहे. या आगीमुळे अंबरनाथ पुढील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ बंब पोहोचले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीच्या वेळी १३ कामगार कंपनीत उपस्थित होते. कामगार वेळीच कंपनीतून बाहेर पडल्याने जीवित हानी टळली. तसेच अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
अधिक वाचा : ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये भारताची 23 गुणांची झेप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola