हिवरखेड (प्रतिनिधि) : येथील काही युवकांना एक माकड मृतावस्थेत दिसून आल्यामुळे त्यांचे रुदय पाझरले आणि त्यांनी आपसात चर्चा करून सदर माकडाचा हिंदू संस्कृती आणि रीतिरिवाजाने अंतिम संस्कार करण्याचे ठरविले. सुरज चौबे, मनिष येनकर, शरद इंगळे अंकुश निळे, प्रफुल कवळकार, अभिषेक माणिक, या युवकांनी स्वखर्चाने,रितीरिवाजाने स्मशान भूमीत नेले, आंघोळ घातली मंत्रोपचार सहित सर्व पूजापाठ केले. खड्डा खोदला आणि पुष्पवृष्टि करीत दिवंगत माकडाला समाधी दिली. यावेळी अनेक युवक भावनात्मक झाले आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सदर माकडाचा अंतविधि करतांना जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता यांच्या या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola