अकोला (शब्बीर खान) : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. यु.काँ. जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष अॅड. महेश गणगणे व शहर अध्यक्ष अंशूमन देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने केली. राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिर्दीला बुधवारी चार वर्षे पूर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक काँग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गांधी-जवाहर बाग येथे जमलेल्या कॉँग्रेसजनांची अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकNयांच्या हितासाठी सरकारला सुुबूद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात पराग कांबळे, आकाश सिरसाट, संजय देशमुख, अब्दुल सलाम, अभिलाश तायडे, अक्षय गणोरकर, सैय्यद अजरोद्दीन, अब्दुल कलीम, सागर तेलगोटे, कपिल रावदेव, अनंतराव बगाडे, डॉ. भागवत, राजकुमार सिरसाट, पुष्पा देशमुख, डॉ. वर्षा बडगुजर, आशा कोपेकर, राहुल कुNहे, पुरुषोत्तम चतारे आदी सहभागी झाले. युवक काँग्रेसने मराठा, धनगर आरक्षण, शेतकNयांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन; फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाच्या विषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लीनचिट दिल्याने क्लीनचिटासन; शेतकऱ्यांविषयी अपशब्द काढणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक प्रश्नावर दिल्या जाणाऱ्या धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळ प्रश्नी सदृष्य शब्द वापरल्याने अंशत: सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले.
अधिक वाचा : राज्य सरकारकडून 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यात गंभीर परिस्थिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola