अकोला :- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अकोला कडून उद्या जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक प्रमिलताई ओक सभागृह अकोला येथे या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकार विद्यापीठ अनुदान आयोग बंद करून त्या ठिकाणी हायर एज्युकेशन ऍक्ट आणण्याचे धोरण राबवित आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होणार आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. कारखाने बंद पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. महाराष्ट्रातल्या 6,500 जिल्हा परिषद शाळांची पडझड झाली आहे. ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिक्षण घेणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावरील खर्च कमी करत आहे. अश्या वेळेस “सम्यक विद्यार्थी आंदोलन” या संघटनेची जबाबदारी अधिक महत्वाची आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप सरकार देत नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत आहे. याच कारणामुळे यावर्षीच्या मार्च महिन्यापासून ते आताच्या ऑक्टोबर महिन्या अखेर पर्यंत 117 मोर्चे काढणारी एकमेक संघटना म्हणून आज सम्यक विद्यार्थी आंदोलनचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे.
अधिवेशन मध्ये प्रमुख वक्त्यांचेसुद्धा मार्गदर्शन होणार आहे. त्यामध्ये मुंबई येथील पीपल्स इंप्रूमेंट ट्रस्टचे डॉ.प्रा.एस.एस.धाकतोडे,शिवाजी कॉलेज अकोलाचे उपप्राचार्य डॉ.एम.आर.इंगळे सर आदिंचे विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अन्यायाबाबतीत व्याख्यान होणार आहे.हे जिल्हा स्तरीय अधिवेशन तीन सत्रात असुन अधिवेशनाला सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हा निरिक्षक स्वातीताई भारतीय,आ बळीराम सिरस्कार,मा.आ हरीभाऊ भदे,सम्यकचे जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांच्या सह सम्यकचे अकोला जिल्हा महानगरातील सर्वच पदाधिकारी उपस्थित राहतील.तरी अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महानगर महासचिव पवन गजानन गवई यांनी केले आहे.
अधिक वाचा : विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, दहा टक्के नुकसान पातळी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola