अकोला – गुलाबी बोंडअळीने यंदाही पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांवर आढळून आला आहे,’ असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाद्वारे तसेच तालुकास्तरीय सर्वेक्षण समितीमधील कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी, वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील गंगानगर, यवतमाळ जिल्हयातील सातेफळ, चिकणी तसेच बुलडाणा जिल्ह्यातील आसा, आंबेटाकळी, रामनगर बोरी अडगाव, किन्ही येथे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हिरव्या बोंडामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यावर आढळून आला आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशी, हलक्या ते मध्यम जमिनीतील हिरव्या कपाशीमध्ये जास्त आढळून आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सरासरी दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियस असल्याने या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. मात्र आत यापुढे तापमान जसे वाढत जाईल तसे हिरव्या बोंडामधील गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात वाढ होईल, असे कीटक शास्त्रज्ञ डी.बी. उंदीरवाडे यांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा : महीला सक्षमीकरनासाठी 400 कार्यशाळांचा टप्पा पुर्ण; अकोला पोलिस दलाच्या “स्वास” टीमची यशस्वी घोडदौड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola