(अकोला प्रतिनिधी) : अकोल्याचे पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून ‘जननी -२ ‘ उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी समाजातील नेतृत्वगुण असलेल्या महिलांना कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात येऊन ‘S W A S’ (soldier for women and safety ) महिला सुरक्षा रक्षक टीम तयार करण्यात आली . जननी -२हा उपक्रम समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावा व सर्वांना कायद्यांबाबत सज्ञान करण्याच्या दृष्टिकोनातून अकोला जिल्हयातील सर्व विद्यालय – महाविद्यालयात कार्यशाळेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले . या उपक्रमा अंतर्गत आज ४०० कार्यशाळांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला .
त्यानिमित्याने आज दि .३० ऑक्टोबर मंगळवार रोजी , सार्वजनिक विद्यालय , चोहोट्टा बाजार येथे अकोला स्वास टीमच्या दोन कार्यशाळा संपन्न झाल्या.या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय तसेच महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा यावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी टीमचे अभिनंदन करण्यासाठी विद्यालयात संस्थेचे व्यवस्थापक मा . शंकररावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रस्तुत कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. यात गुड टच – बॅड टच , सायबर क्राइम, महिला छेडखाणी प्रतिबंधक उपाययोजना या विषयी पोलीस काँ. विशाल मोरे तसेच पोलीस काँ.गोपाल मुकुंदे यांनी विविध उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. स्वप्ना लांडे यांनी महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विविध प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितला.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्ण सहभाग होता. कार्यशाळेला सार्वजनिक विद्यालयाचे व्यवस्थापक शंकरराव पाटील , संचालक मोहन पाटील ,प्राचार्य प्रवीण साळकर सह सर्व प्राध्यापक , शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा अमोल खोटरे यांनी तर आभार प्रदर्शन शंकरराव घुगे यांनी केले.
अधिक वाचा : हद्दवाढीतील प्रभागांसाठी मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola