• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

कौशल्य सेतू अभियानामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी – विनोद तावडे

Team OurAkola by Team OurAkola
June 3, 2020
in राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
कौशल्य सेतू अभियानामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मिळणार रोजगाराची संधी – विनोद तावडे
11
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्यावर बऱ्याचदा घर, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. मात्र आता इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी मिळणार असून ‘कौशल्य सेतू अभियान’ हा उपक्रम देशभरात उल्लेखनीय ठरला असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाद्वारे करिअरची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘कौशल्यसेतू अभियानातील’ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. या कार्यक्रमाला तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु श्री. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

श्री. तावडे यावेळी म्हणाले, आजच्या युवकांना काळानुरुप रोजगाराभिमुख शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ‘नापास’ हा शिक्का पुसून टाकण्यासाठी राज्य शासनाने राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत या ‘कौशल्य सेतू अभियाना’द्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या कौशल्य सेतू अभियानामध्ये इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत ‘यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्स’ व ‘नॅशनल युवा कोऑपरेटिव्ह सोसायटी’ या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येते.

बऱ्याचदा इयत्ता दहावीमध्ये नापासाचा शिक्का बसल्याने विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जातात. युवा पिढीचे भवितव्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘कौशल्य सेतू अभियान’ सुरु केले आहे. या योजनेमुळे इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधण्याची संधी उपलब्ध झाल्याने स्किल इंडिया या महत्वाकांक्षी अभियानाला आणखी बळ मिळणार असून यामुळे देशाची युवा पिढी स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे.

नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटी व यशस्वी स्किल्स या दोन संस्थांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सहा महिने कालावधीसाठी मोबाईल रिपेअरिंग, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन (टू अँड थ्री व्हीलर), मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन अशा विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अधिक वाचा : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना राज्य परिवाहन महामंळाचा(S.T.)चा प्रवास मोफत

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

कोरेगाव भीमा प्रकरणात तिघांना जामिन नाकारला

Next Post

महीला सक्षमीकरनासाठी 400 कार्यशाळांचा टप्पा पुर्ण; अकोला पोलिस दलाच्या “स्वास” टीमची यशस्वी घोडदौड

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
महीला सक्षमीकरनासाठी 400 कार्यशाळांचा टप्पा पुर्ण; अकोला पोलिस दलाच्या “स्वास” टीमची यशस्वी घोडदौड

महीला सक्षमीकरनासाठी 400 कार्यशाळांचा टप्पा पुर्ण; अकोला पोलिस दलाच्या "स्वास" टीमची यशस्वी घोडदौड

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.