मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. राज्य सरकारने दुष्काळसदृश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देणार, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली.
राज्य सरकारने नुकत्याच दुष्काळसदृश्य तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात एस.टी. महामंडळही आपलं योगदान देत आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. आता सरकारने दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत १०० टक्के इतकी देण्यात येईल. ही संपूर्ण सवलत एस.टी. महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळावर साधारण ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातील साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळेल, असं रावते यांनी सांगितलं.
पावसाअभावी अन्नदाता शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश्य परिस्थीतीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एस.टी.चे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एस.टी.चे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणं हे एसटीचंही कर्तव्य असल्याचं मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं.
अधिक वाचा : मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टीत भीषण आग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola