अकोला (प्रतिनिधी) : हद्दवाढीनंतर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावातील विकास कामांच्या आराखड्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ९६ कोटीचा प्रस्ताव मान्य करून विकास कामांचा मार्ग मोकळा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीतील नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे.
अकोला महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या परिसरासाठी प्रशासनाने १०० कोटीचा विकास आराखडा तयार केला होता. हा आराखडा शासनाने १४ मार्च २०१८ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर २० कोटी रुपये मनपाला देण्यात आले. त्यात मनपाला पाच कोटी रुपयांचा मॅचिंग फंड टाकावयाचा आहे.
त्यानंतर या प्रस्तावित आराखड्यानुसार अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सोशल आॅडिट करण्यात आले होते. आराखड्यानुसार प्रस्तावित कामे त्या भागाच्या गरजेनुसार आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा प्रशासनामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे २९ आॅगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय मान्यता देवून २६ आॅक्टोबर रोजी ९६ कोटी २९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील २०कोटींचा निधी आधीच मिळाला आहे.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
हद्दवाढीतील बहुतांश भाग अकोला पूर्व मतदारसंघात येतो. या भागाचा विकास व्हावा म्हणून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी सातत्याने पाठपुरवा करून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांमार्फत मंजूर करून घेतला.
अधिक वाचा : अकोला शहराच्या विकासासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola