अकोला (प्रतिनिधी) : मागील 4 वर्षात अकोला जिल्हयात मोठया प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. शहरात सुसज्ज अशी ई-लायब्ररीचे लोकार्पण नुकतेच झाले आहे. अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल , जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय इमारत , सांस्कृतिक भवन यासारखे इतर प्रशासकीय इमारतीचे कामे प्रगतीपथावर आहेत. अकोला शहराच्या विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुंदर व सुसज्ज अशा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर , निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, श्री. अपार नोंदणी अधिकारी श्री. सरपटवार , सहनिबंधक श्रीमती मेश्राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे मोठया प्रमाणात महसुल शासनाला प्राप्त होत असतो. तसेच खरेदी विक्री व विवाह नोंदणीचे दस्ताऐवज जतन करण्यात येते. यासाठी सुसज्ज अशा इमारतीची मागणी मागील काही वर्षा पासुन होती. सुसज्ज इमारतीमुळे येथे काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच अभिलेख जतन करण्यात मदत होणार आहे. या विभागाने आपल्या कार्यालयातील सर्व डाटा संगणीकीकरण करून डिजीटलाझेंशन्स करावा असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. इमारतीच्या फर्नीचर साठी आवश्यकता असल्यास नियोजन विभागातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना नोदंणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी म्हणाले की, या कार्यालयातर्फे मागील दिडशे वर्षांपासूनचा रेकाड जतन करण्यात आलेला आहे. दस्ताऐवज नोंदणी करणे व त्याच्या अभिलेखाचे जतन करणे हे या कार्यालयाचे काम आहे. सुसज्ज इमारत तयार झाल्यामुळे अभिलेख जतन करणे अधिक सोईचे होणार असल्याची माहिती श्री. जोशी यांनी दिली.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकार्पण कोनशीलेचे अनावरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी 2 कोटी 61 लक्ष रूपये खर्च करून बांधलेल्या दुमजली प्रशासकीय इमारतीचे पाहणी केली. या इमारतीमध्ये सह जिल्हा निबंधक वर्ग -1 , सह दुय्यम निबंधक वर्ग-2 , क्रमांक 1,2,3 चे कार्यालय राहणार आहे. इमारतीच्या फर्नीचर साठी आवश्यकता असल्यास नियोजन विभागातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहजिल्हा निबंधक वर्ग-1 श्रीमती बि.के.मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वरिष्ठ लिपीक धनंजय देशपांडे व उपस्थितांचे आभार वरिष्ठ लिपीक सुनिल चव्हाण यांनी मानले यावेळी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे मुधकर राखोंडे , सुरेश शेटे, नितीन चव्हाण , एस.एस. रोकडे, दिपाली वर्गे , पल्लवी लाबांडे, सारीका धांडे सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : वरली अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola