अकोट (शब्बीर खान): आजपर्यत जो काही विद्यार्थ्यांवर ४ वर्षाच्या काळात अन्याय झालेला आहे त्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा,आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा, महाविद्यालय घेण्यात येणाऱ्या अवाढव्य प्रवेश शुल्काचा प्रश्न,विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) संदर्भातील प्रश्न असो यांसह अनेक गोष्टींना विद्यार्थ्यांना सतत तोंड द्यावे लागत आहे.महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी संघटना काम करत असतांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरतांनी कुठ दिसत नाहीत तर संपुर्ण महाराष्ट्रात अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन ची स्थापना करुन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे.
आज पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात सम्यकचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेशजी भारतीय यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात १५० च्या वर मोर्चे आंदोलने काढण्यात आले त्यातील काही प्रश्न मार्गी लागलेले आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा आयोजित १ नोव्हेंबर ला जिल्हा अधिवेशन संदर्भात बैठकिचे औचित्य साधून “गाव तिथे सम्यक” उपक्रम राबवण्यात येत आहे.त्याअंतर्गत अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातील व अकोट तालुक्यातील ग्राम किनखेड पुर्णा,केळीवेळी,दहिहांडा,वरुर जवुळका,विटाळी या गावात अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघाचे भारिप बहुजन महासंघ लोकप्रिय मा.आमदार हरिदासजी भदे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी केळीवेळी गावातील जाहिर सभेत “विद्यार्थ्यांवर पुढील काळातील राजकारणाच भवितव्य असेल”अस प्रतिपादन मा.आमदार हरिदास भदे यांनी करुन विद्यार्थ्यांच्या मनात उर्जा निर्माण केली.ग्राम मंडळाचे अध्यक्ष केशव बुले गुरुदेव यांनी केळीवेळी गावचा विकास फक्त भारिप बहुजन महासंघच करु शकते आता खासदाराने दत्तक घेतलेले गाव आमदार हरिदास भदे यांनी दत्तक घेवुन गावचा विकास करावा अशी विनंती केली.
यावेळी जि.प.अध्यक्षा सौ संध्याताई वाघोडे,सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, भारिप चे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा महासचिव दीपक गवई,सम्यकचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामनिक, जिल्हा संघटक राजकुमार दामोदर, महासचिव भाग्यश्री इंगळे, कोषाध्यक्ष योगेश किर्तक,महानगर महासचिव पवन गजानन गवई,अकोला पुर्व तालुका अध्यक्ष भुषण घनबहादुर,दिपक बोडखे,केशव बिलबिले,अन्सार भाई,आडे साहेब,शोभित आठवले यांच्या सह गावातील भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे सर्व पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola