मुंबई : वेस्ट इंडिज विरुध्दच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात आले. ज्यावेळी भारताने पहिल्या षटकात बिनबाद ५ धावा पूर्ण केल्या त्यावेळी शिखर आणि रोहितने सचिन आणि सेहवाग या सलामी जोडीचा विक्रम मोडला.
भारताची सध्याची सर्वात यशस्वी सलामी जोडी शिखर आणि रोहित यांनी आज डावाची सुरुवात केली. त्यांनी सामन्याच्या पहिल्याच षटकात सचिन आणि सेहवाग या सलामी जोडीचा विक्रम मोडला. या जोडीने भारतासाठी सलामीला येत ३९१९ धावा केल्या होत्या. रोहित आणि शिखरने या डावात ५ धावा करत हा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम मोडला. आता शिखर आणि रोहितच्या पुढे सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली या सलामी जोडीचा ६६०९ धावांचा विक्रम आहे.
याच विक्रमाबरोबर रोहितने विंडीज विरुध्द १००० धावा देखील पूर्ण केल्या. त्याने या १००० धावा पूर्ण करण्यासाठी २४ इंनिंग घेतल्या. विंडीज विरुध्द सर्वात जलद १००० धावा दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने केल्या आहेत. त्याने १४ डावात हा टप्पा पूर्ण केला. त्यापाठोपाठ डिव्हिलियर्स (१७) आणि विराट कोहली (२१) आहेत आणि आता रोहितने चौथे स्थान पटकावले आहे.
अधिक वाचा : आगामी टी-२० संघातून धोनी वगळलं; कोहलीला विश्रांती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola