जकार्ता : इंडोनेशियाचे लायन एअरवेजचे विमान सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच समुद्रात कोसळले आहे. विमान जेटी- ६१० जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात होते. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रवक्ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. लायन एअर बोईंग ७३७ प्रवासी विमानात कर्मचाऱ्यांसह १८८ प्रवासी होते. विमानातील सर्वचजण दगावले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार विमानाने जकार्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. विमान सुमात्रातील पान्गकल पिनांगला जात होते. उड्डाणाच्या १३ मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. शोध मोहिमेदरम्यान जावा समुद्रकिनारी विमानाचे अवशेष आढळून आले आहेत.
Serpihan pesawat Lion Air JT 610 yang jatuh di perairan Karawang. Beberapa kapal tug boad membantu menangani evakuasi. Video diambil petugas tug boad yang ada di perairan Karawang. pic.twitter.com/4GhKcRYkpG
— Sutopo Purwo Nugroho (@Sutopo_PN) October 29, 2018
विमानात एकूण १८८ प्रवासी होते. यामध्ये १७८ प्रौढ, १ बालक, २ नवजात, २ पायलट आणि ५ फ्लाइट अटेंडंट यांचा समावेश होता. प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. शोध मोहीम सुरु आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी विमानाने उड्डाण केले होते. विमानाचा शोध घेण्यासाठी शोध व मदत अभियान सुरु करण्यात आले. परंतु, काही वेळातच विमान कोसळल्याचे वृत्त आले.
अधिक वाचा : विलियम नर्डहॉस आणि पॉल रोमर यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola