पातूर(सुनील गाडगे) : भारिप बहुजन महासंघाचे वतीने पातूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हावा,सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे,सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळवा,शेतीसाठी वीज खंडित होऊ नये, नाफेड ने उडीद मुग सोयाबीन तूरीची खरेदी सुरू करावी, व्यापाऱ्यांनी हमी भावाने मालाची खरेदी करावी,अन्यथा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या व इतर मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा यासाठी आज तहसील कार्यालय पातूर येथे भारिप बहुजन महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला.व तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.व पातूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने,आमदार बळीरामजी शिरस्कार,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट व भारिप बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी युवा कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : नगर परिषद पातूर प्रशासनाला शासनाची चपराक सैय्यद ऐजाज हाजी सैय्यद अयुब यांच्या प्रयत्नांना यश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola