तेल्हारा(प्रतिनिधी) : स्वप्न पाहण्याचे पैसे पडत नाहीत म्हणून ती पहा पण मोठी स्वप्ने पहा आणि त्या दिशेने झेप घ्या तरच प्रगती शक्य आहे,या जगात आपोआप काहीच मिळत नाही असा कानमंत्र प्रख्यात प्रेरणादायी वक्ते ऍड गणेश हलकारे यांनी आज येथे दिला.
भागवत मंगल कार्यालयात लोकजागर मंचाने आयोजित केलेल्या ” अभ्यास कसा करावा ? ” या कार्यशाळेत ऍड हलकारे बोलत होते.कार्यशाळेच्या उदघाटन सत्राला लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे ,कार्याध्यक्ष ऍड सुधाकर खुमकर ,सरचिटणीस पुरुषोत्तम आवारे ,युनिक अकादमीचे संचालक प्रा.अमोल पाटील उपस्थित होते.
विदयार्थी दशेत जो तो येतो आणि अभ्यास करा असा सल्ला देतो पण अभ्यास कसा करावा हे मात्र सांगत नाहीत ,अभ्यास करताना कायम एक जागा निवडा, अभ्यास करण्याची वेळ ठरवा,झोपून,रेटून,किंवा फिरत अभ्यास करू नका असे हलकारे म्हणाले.अभ्यास कुणीही करतो पण त्यात गुणवत्ता नसेल तर त्याला कुणीही विचारत नाही हे लक्षात घ्या ,अभ्यासचा जसा कंटाळा येतो तसा आनंद सुदधा घेता येतो फक्त विषय स्मजला पाहिजे ,तो समजला तर आनंद वाढत जातो असे हलकारे म्हणाले.
आधी वाचन मग अभ्यास नंतर सखोल अभ्यास अशा क्रमाने आपण जायला हवे ,कधीही,कुठेही आणि कुणीही प्रश्न विचारला तर त्याचे समाधान करणे याला अभ्यास म्हणता येईल अन्यथा आपण नेहमी करतो ती घोकंपट्टी असेही ऍड हलकारे म्हणाले.
प्रारंभी पुरुषोत्तम आवारे यांनी प्रास्ताविक करून लोकजागर मंच करीत असलेल्या शिक्षण उवक्रमांची माहिती दिली,संचालन ऍड सुधाकर खुमकर यांनी केले,गोपाल जलमकर आणि चंद्रकांत मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.राज्य सेवा परीक्षेत यश मिळवणाऱ्या कु किरण वरणकार हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना हायकोर्टाची नोटीस; कर्जमाफीच्या अंमलबजावणीत उणिवा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola