अकोट (दिपक रेले): देशाच्या भावी पिढीची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांवर आहे. त्यामुळेच शिक्षकांना सर्वश्रेष्ठ मानतात, आदर करतात मात्र काही शिक्षक आपले मूळ कर्तव्य विसरून आपल्यातले अवगुनांना प्राधान्य देत विक्षिप्तपणे वागतात.या मुळे शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टी बदलन्याची शक्यता नाकारता येत नाही.याचेच जिवंत उदाहरण समोर आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरवडी येथील जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक असलेला सुधीर भानुदास कोलटक्के (३७) याने एका ३५ वर्षीय महिलेला तुझे फोटो व्हायरल करतो.तू माझ्या सोबत मैत्री कर, असे म्हणून बदनामी करण्याची धमकी देत होता.बदनामी टाळायची असल्यास महिलेला शरीर सुखाची मागणी कोलटक्के याने केली.तसेच गजानन महाराज विहिरीवर त्याने विनयभंग सुद्धा केला.अशी तक्रार पीडित महिलेने शुक्रवारी रात्री अकोट ग्रामीण पोलिसांत दिली.ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.त्यावरून पोलिसांनी सुधीर कोलटक्के याच्या विरुद्ध ३५४,३५४ अ, १ (१),(२) कलमाप्रमाणें गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एएसआय नारायण वाडेकर, गजानन भगत,अनिल सिरसाट,नंदू कुलट यांचे तत्काळ पथक गठीत करून सुधीर कोलटक्के या शिक्षकाला अमरावती येथिल विरतानाजी कॉलनी व्ही.एम.व्ही.रोड येथून शुक्रवारच्या मद्यरात्री अटक केली.त्याला अकोट न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली आहे.