भांबेरी (योगेश नायकवाडे) : तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी 26 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
भांबेरी येथील एक महिला घरामध्ये स्वयंपाक करित असताना गावातीलच राजू सुधाकर भोजने याने तीच्या घरात प्रवेश करून विनयभंग केला.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी आरोपी युवका विरुद्ध भादंवि कलम 354,452 नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.