नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे माजी नेते आणि खासदार तारिक अन्वर यांनी शनिवारी (दि.२७) सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राफेल डील प्रकरणावरुन पाठराखण केल्यानंतर प्रचंड नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा न करता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अन्वर हे बिहारचे रहिवासी असून येथूनच ते राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडूण आले आहेत.
राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर अन्वर यांच्यासमोर दोन प्रमुख पर्याय होते त्यांपैकी एक लालू प्रसाद यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि दुसरा पर्याय काँग्रेस. यांपैकी अन्वर यांनी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. अन्वर हे मुळचे काँग्रेसचेच असून राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी मंत्रीमंडळात काम केले आहे. या काळात त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे.
अधिक वाचा : काँग्रेसची ‘पूजा धमाका’ ऑफर; राफेलची किंमत सांगा ५ कोटी जिंका
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola