भारताची अव्वल कुस्तीपटू पूजा धांडा ने गुरुवारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात नॉर्वेच्या ग्रेस बुलेन हिला १०-७ असे नमवून पूजाने कांस्यपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारी ती भारताची तिसरी महिला कुस्तीपटू ठरली आहे. याआधी अलका तोमरने २००६ मध्ये तर गीता फोगट हिने २०१२ मध्ये कांस्यपदक पटकावले होते.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला ६२ किलो वजनी गटाच्या रिपिचेज फेरीत हंगेरीच्या मारियाना सास्तिन हिच्याकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले.
अधिक वाचा : IND vs WI :भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराहला वन डे संघात संधी; शामीला वगळले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola