नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्राव्होच्या या तडकाफडकी निर्णयानं क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यापुढे तो फक्त व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळं ब्राव्हो आता आयपीएलसारख्या टी-२० लीग स्पर्धांमध्येच खेळताना दिसेल. ३५ वर्षीय ब्राव्होनं २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्ट इंडिजकडून त्यानं ४० कसोटी, १६४ एकदिवसीय, तर ६६ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. ब्राव्होनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. २०१६ सालच्या टी-२० विश्वविजेत्या संघात ब्राव्होचं मोलाचं योगदान होतं.
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती जाहीर करत आहे. गेली १४ वर्ष वेस्ट इंडिजच्या संघाचं प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. २००४ साली इंग्लंडच्या लॉर्ड्सवर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तो क्षण आजही माझ्या लक्षात आहे. तेव्हाचा उत्साह आणि प्रेम संपूर्ण कारकिर्दीमध्ये माझ्यासोबत कायम होता’, असं ब्राव्होनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.
अधिक वाचा : विराट कोहलीच्या १० हजार धावा, सचिनचा विक्रम मोडला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola