तरोडा (कुशल भगत) : अकोट पंचायत समीती अंतर्गत येत असलेल्या कावसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत शोभेची ईमारत बनली आहे. गेल्या दोन वर्षा पासुन कावसा येथील आरोग्य केंद्राची नविन ईमारत ऊभारण्याचे काम सुरू आहे व गेल्या ३ महीण्या पासुन प्राथमीक आरोग्य केंद्राची ईमारत पुर्ण पने काम झाले आहे. पण अजुन सुध्दा ईमारतीचा मुर्हत अधिकार्याना सापडत नाही असे दिसुन येत आहे.
कावसा प्राथमिक केंद्राला एकुण ४४ गावे आहेत व १० उपकेंद्र आहेत तरी पण या केंद्रात सुविधांचा बट्याबोळ झालेला दिसुन येत आहे. केंद्रात पिण्याला वेवस्तीत पाणी नाही पिण्याच्या पाण्याचा एक मोठा टँक भरलेला असतो. पण तो खुप घाण आहे त्यावर माकड बसतात. बऱ्याच दिवसा पासुन धुतलेला नाही. माकड घाण सुध्दा करतात. तेच पानी रुग्णांना पिण्यासाठी वापरावे लागते.
जर एखाद्या रूग्णाला गोळी घ्यायची असली तर पाणी प्यायला ग्लास नाही व पिण्याच्या पाण्याजवळ फार मोठी घान साचलेली आहे. ते दूषित पाणी पिल्याने रूग्ण आणखी आजारी पडु शकते कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज १०० ते १३० रुग्ण येतात व केंद्रात कोण्या दिवसी गोळ्या नाहीत. तर कोण्या दिवशी औषध नाही. असे वाटते की आरोग्य केंद्र वार्यावर सोडले आहे.
गेल्या ३ महीने झाले कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन ईमारत झाली. पण मुर्हत निघणार कधी, चांगल्या सुविधा रूग्णाना मिळणार कधी, असे बर्याच नागरीकांमधे बोलले जात आहे. सध्या कावसा, तरोडा , दिनोडा, मरोडा, पळसोद, टाकळी, देर्वडा, गिरजापुर, रेल, धारेल, पाटसुल, आलेवाडी व बऱ्याच गावात पाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्याने व केर कचरा साचल्याने डांसाचे प्रमाण वाढले आहे.
तसेच तापमाणात वाढ झाल्यामुळे व वातावरणातील बदलावामुळे परिसरात रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्दि, खोकला, ताप, डोकेदुखी, हिवताप, अंगदुखी होत आहे. रोज आरोग्य केंद्रात १०० ते १३० रूग्ण येतात. पण अपुरी सुविधा असल्या मुळे नागरीक तथा रूग्ण हैराण झाले आहेत. या गंभीर बाबी कडे वरीष्ठ अधिकार्यानी काळजी पुर्वक लक्ष देण्याची गरज भासत आहे, असे नागरीकांमधे व रुग्णामधे बोलले जात आहे.
नविन झालेल्या ईमारतीचे लाईट फिटिंग राहलेल आहे लाईट फिटिग झाल्यास लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
( डाँ.पंकज शर्मा )
वैद्दकिय अधिकारी कावसा.
प्राथमिक केंद्राला ४४ गावे आहेत रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणुन वरिष्ठ अधिकार्यानी लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरु करावे
(गोपाल सुरेश दामोधर)
नागरीक कावसा
प्राथमिक आरोग्य केद्रात सुविधांचा बट्यांबोळ झाला आहे
रूग्णाची गैरसोय होत आहे या कडे लोकप्रतीधीनी लक्ष देण्यात यावे.
( विलास साबळे)
संरपच तरोडा
अधिक वाचा : कर्ज फेडण्या साठी उच्च शिक्षित तरुण बनला मोटारसायकल चोर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola