अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी अकोल्यात आले. त्यांनी काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेअंती मतभेद दिसून आल्याने त्यांनी जिल्हा व महानगर कार्यकारिणी बरखास्त केली. नवीन कार्यकारिणी दिवाळीनंतर घोषित करणार, असेही ते या वेळी म्हणाले.
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील तसेच महानगरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार कार्यकर्त्यांनीही त्यांच्या कामगिरीचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. जिल्ह्यातील माहिती घेताना येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनभेद असल्याचे दिसून आल्याने त्यांनी जिल्हा कार्यकारिणी आणि महानगर कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले. दिवाळीनंतर मुंबईतील नेते अकोल्यात येतील. ते नेते अकोल्यातील कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील व त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत काम करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील निवडून आलेल्या दोन सरपंचांचे राज ठाकरे यांनी स्वागत केले व जिल्ह्यातील समस्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतल्या. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, रणजित राठोड, रामा उंबरकर, ललित यावलकर, सरपंच सतीश फाले, आदित्य दामले, रवींद्र फाटे, अरविंद शुक्ला, राकेश शर्मा यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
अन् राज ठाकरे यांनी फेकला पेन
राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर महिलांनी त्यांना ऑटोग्राफ मागितला. लगेच दुसऱ्या पदाधिकाऱ्याने तत्काळ त्यांना खिशाचा पेन काढून दिला. तो पेन चालत नसल्याने राज ठाकरे यांनी तो तावातावाने फेकून दिला. त्या पेनाला हात लावण्याचा प्रयत्न एकाने केल्यानंतर तो दूर फेकून दे, असा दमही त्यांनी भरला.
अधिक वाचा : नरेंद्र मोदी हे सेल्समन, शॉटगन पुन्हा धडाडली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola