• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कर्ज फेडण्या साठी उच्च शिक्षित तरुण बनला मोटारसायकल चोर

Team OurAkola by Team OurAkola
June 4, 2020
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
कर्ज फेडण्या साठी उच्च शिक्षित तरुण बनला मोटारसायकल चोर
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (प्रतिनिधी) : समाजातील चांगल्या घरातील तरुण मुले किरकोळ कारणावरून चोरी सारख्या गंभीर गुन्ह्या कडे वळत असून त्या मध्ये उच्च शिक्षण घेतलेली तरुण मुले सुद्धा सामील असल्याचे वास्तव अकोट शहर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या एका चोरी च्या गुन्ह्यातून समोर आले असून समाज व पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे हेच ह्या घटने वरून अधोरेखित होते.

पोलिस स्टेशन अकोट शहर येथे फिर्यादी राजेश वासुदेव राव वानखेडे राहणार राजदे प्लॉट अकोट, ह्यांनी फिर्याद दिली होती की ते राहत असलेल्या पुर्वाज अपार्टमेंट मधील पार्किंग मधून काही दिवसांपूर्वी त्यांची हिरो होंडा मोटार सायकल क्रमांक MH30 AD 7846 किंमत 49,000 ही कोणी तरी अज्ञात इसमाने चोरून नेली होती, सुरवातीला त्यांनी काही दिवस शोध घेतला ,मिळून न आल्याने पोलिस स्टेशन अकोट शहर येथे फिर्याद दिल्या वरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तपास सुरू असताना अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली की अकोट शहरातील टाकपूरा येथे राहणार धनराज उर्फ गुड्डू महेश जोशी हा तरुण विना कागदपत्रांच्या मोटार सायकली विकत आहे, त्या वरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पुढे आलेली माहिती अशी की हा तरुण Bsc कॉम्पुटर झाला असून दीड वर्षा पूर्वी पुणे येथे नोकरी ला सुद्धा लागला होत., परंतु कंपनीत पगार कमी होता, त्यातच सिल्वासा येथे जात असताना तो चालवीत असलेल्या त्याचे मित्राच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला व कार चे बरेच नुकसान झाले, ते नुकसान भरून देण्या साठी त्याने, अकोला येथील एका व्याजाने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून 20,000 हजार रुपये कर्ज घेतले.

ते कर्ज 1 वर्षा च्या आत फेडू न शकल्याने व पैश्याची व्याजासह परतफेड करण्याचा तगादा सुरू झाल्या मुळे, सर्व प्रथम अकोला येथील बसस्टँड जवळून मोटार सायकल चोरली व 17,000 हजारात अकोट ला विकली, त्या नंतर अश्या आणखी तीन मोटार सायकली , अकोट मधीलच त्याचे मित्र वैभव मोझेस गायकवाड वय 22, राहणार हिवरखेड रोड अकोट, प्रणय अनिल तेलगोटे वय 20,राहणार जलतारे प्लॉट अकोट ह्यांचे मदतीने चोरल्या.

त्याने दिलेल्या कबुलीवरून इतर 2 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली असून त्यांचे कडून

1) हिरो होंडा प्लेसर मोटारसायकल क्रमांक MH 30AD 7846 किंमत 49,000

2) होंडा ड्रीम योगा मोटार सायकल खोटा क्रमांक टाकलेला किंमत 50,000,

3) हिरो हंक मोटारसायकल खोटा क्रमांक टाकलेली किंमत 50,000

4) हिरो होंडा CD डीलक्सकिंमत 30,000 रुपये

अश्या एकूण 1,79,000 रुपयांच्या 4 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून तिन्ही ओरोपींना आज विद्यमान न्यायालया समोर उभे करून पोलिस कोठडी घेऊन अकोट शहरातील चोरी गेलेल्या मोटार सायकली चा छडा लावण्यात येणार आहे.

ही कारवाई अकोट शहरचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, हेड कॉन्स्टेबल संजय घायल, कर्मचारी राकेश राठी, गोपाल अघडते, सुलतान पठाण,विजय सोळंके ह्यांचे पथकाने केली.

अधिक वाचा : मुलाला मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

राज्य कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट मिळणार

Next Post

तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले

तेल्हाऱ्यात चिडीमारांची अल्पवयीन मुलींची छेडखाणी,काही काळ तणाव तर मध्यस्ती नंतर प्रकरण आपसात मिटवले

कार्यकर्त्यांशी संवादानंतर राज ठाकरे यांनी जिल्हा, शहर कार्यकारिणी केली बरखास्त

कार्यकर्त्यांशी संवादानंतर राज ठाकरे यांनी जिल्हा, शहर कार्यकारिणी केली बरखास्त

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.