विशाखापट्टनम : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावे एक नवा विक्रम स्थापित केला आहे. वनडे इंटरॅशनलमध्ये सर्वात कमी डावांत १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून विराटच्या नावाची नोंद झाली आहे. विराटने सचिन तेंडुलकरचा १७ वर्ष जुना जागतिक विक्रम मोडला आहे. या मॅचआधी विराटच्या नावे २१२ सामन्यांतील २०४ डावांमध्ये ९,९१९ धावांची नोंद होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम सामन्यादरम्यान विराटने आज बुधवारी अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर हा नवा विक्रम केला. विराटने केवळ २०५ डावांमध्ये १० हजारी धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरने ३१ मार्च २००१ मध्ये २५९ डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनपेक्षा विराट ४५ डाव कमी खेळला आहे.
सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारताचाच माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. त्यानंतर रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि महेंद्र सिंह धोनीचा क्रमांक लागतो. आतापर्यंत वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने १८,४२६ धावा बनवल्या आहेत. त्यानंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराचं (१४,२३४ धावा) नाव येतं.
अधिक वाचा : कोहली चे ६०वे आंतरराष्ट्रीय शतक; सचिनचे रेकॉर्ड ब्रेक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola