अकोला (शब्बीर खान) : माना पोलीस स्टेशनच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे समोर येत असताना, या मध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी येथील, एका आत्महत्या प्रकरणाची भर पडली, वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने ४०हजार रुपयांची तोडी केल्याची चर्चा, माना पोलीस स्टेशनच्या परिसरात सुरू आहे.
या घटनेची माहिती अशी की, माना येथील राधिका देशमुख हि 16 जानेवारी 2018 रोजी स्वयंपाक घरात जळाली होती. उपचारदारम्यान तिचा 20 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. माना पोलिसनी मर्ग दाखल केला. मृतक राधिकाच्या परिवारातील मंडळीना हेरून ठाणेदाराने गावातील अमोल बोळे विरुद्ध तक्रार देण्याची सल्ला दिली. अमोल आणि मृतक राधिका यांच्यात प्रेमसंबंध होते हे विशेष.
या प्रकरणात दोन्ही पार्टीकडून पैसे काढल्या जाऊ शकते असा सल्ला ठाणेदाराची वसुली करणाऱ्या पोलिसाने दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष ओतले. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनाबतर माना पोलिसांनी 28 मार्च 2018 रोजी अपराध क्रमांक68/2018 कलम 306 चा गुन्हा दाखल करून अमोल ला अटक केली. तब्बल अडीच महिन्यानंतर तक्रार का देण्यात आली ? पोलिसांची भूमिका काय ? अशी चर्चा माना परिसरात सुरू झाली.
मृतकाचा परिवार सुशिक्षित ब कायद्याची जाण असलेला आहे हे विशेष. या प्रकरणात ठाणेदार घुगे यांनी पोलीस अधिकाक्षाच्या नावाने आरोपिकडून व फिर्यादीकडून लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. घुगे यांनी एका पोलिसाला या कामासाठी पूर्णपणे कामाला लावले होते.
या तोडी प्रकरणात हिस्सा न मिळालेल्या पोलिसांनी आता ही बाब उघड केली आहे. लहान मोठ्या कारणाने नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय असलेल्या ठाणेदार घुगे यांनी पोलीस अधीक्षकांची राधिका देशमुख प्रकरणात दिशाभूल केली आहे. वरिष्ठांच्या नावाने खाल्लेला पैसा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यन्त पोहचला की नाही ? अधिकारी गप्प का ? हे प्रश्न निरुत्तरीत आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे गौड बंगाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे प्रकरण पोलीस महासंचालकापर्यन्त पोहचले असून कारवाईचा प्रतीक्षेत आहे.
अधिक वाचा : अकोला-म्हैसांग रस्त्याची बिकट अवस्था झुंज संघटने कडून निवेदन सादर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola