अकोला (शब्बीर खान) : अकोला ते म्हैसांग या रस्त्याची अत्यंत बिकट व्यवस्था झालेली असल्यामुळे झुंज संघटनेकडून झुंज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भारसाकळ यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष सुहास साबे यांचा नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
अकोला ते म्हैसांग रोड हा ग्रामीण भागातील अतिशय रहदारीचा मार्ग असून, हा मार्ग अकोला ते अमरावती जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण दुय्यम मार्ग आहे परंतु या रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून, हा रस्ता अतिशय जीवघेणा झालेला आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामीण भागातील शाळकरी मुले आपल्या मोटरसायकलने येतात तसेच आपल्या ग्रामीण भागातील अनेक लोक तसेच शेतकरी वर्ग आपल्या कामानिमित्य शहरात येतात परंतु या रस्त्याची अशी बिकट अवस्था झाल्यामुळे या रस्त्यावर दररोज किरकोळ तसेच अतिशय गंभीर स्वरूपाचेसुध्दा अपघात होत राहतात. तसेच या रस्त्यामुळे नागरिकांना कंबर, मान आणि मणक्याचे आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा झुंज संघटनेतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी येत्या १५ दिवसात तात्पुरता उपाय म्हणुन डागडुजी चे काम पूर्ण करण्याचे आश्वाशीत केले. यावेळी माजी सरपंच विजय ढेंगे, शंकर खराटे, झुंज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बचे, प्रवक्ते प्रा. एकनाथ खेळकर, महिला जिल्हाअध्यक्ष नम्रता ठोकळ, विद्याार्थी जिल्हाध्यक्ष शुभम पीठलोड, फुटपाथ आघाडी बाळु ढोले, प्रमोद पाचपोहे, सविताताई शेळके, सागर पाटिल, अक्षय वैराळे, सुनील थोप, डॉ. सुरेश नागे, सचिन देशमुख आदि झुंज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola