अकोला (प्रतिनिधी) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित प्रभातेफेरीला विद्यापीठीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी वर्गानी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. जवळपास २००० हून अधिक संख्येने एकसारख्या पोषाखात अतिशय शिस्तीत निघालेल्या प्रभातफेरीला अकोला नगरीचे प्रथम नागरिक मा. महापौर विजय अग्रवाल, कुलगुरू डॉ. विलास भाले, शेतकरी प्रतिनिधी श्री. आप्पासाहेब गुंजकर यांनी हिरवी झेंडी दाखवीत सुरुवात केली.
यावेळी कुलसचिव डॉ प्रकाश कडू, सर्व अधिष्ठाता सहयोगी अधिष्ठाता संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. आधुनिक यांत्रिक कौशल्यधारीत शेति विषयक म्हणी आणी संदेश तसेच नारे देत फेरीतील सहभागी विद्यार्थी अधिकारी वर्गानी जनतेचे लक्ष वेधले.
माननीय कुलगुरु यांचे मार्गदर्शनात आयोजित य़ा प्रभातफेरीत विद्यापीठातील प्रत्येक विभागातील बहुतांश अधिकारी कर्मचारी (शिक्षक व शिक्षकेतर) व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यापीठाची एकता आणी अखण्डता प्रदर्शीत केली.सोमवार दि. २२ ऑक्टोबर, २०१८ ला सकाळी ७.०० वाजता कृषि महाविद्यालयापासून सुरू झालेल्या य़ा प्रभात फेरीचा शहर बगीचा येथे समारोप झाला. याप्रसंगी मा. कुलगुरू डॉ. विलास भाले, संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन डॉ विलास खर्चे, अधिष्ठाता कृषि अभियांत्रिकी डॉ महेंद्र नागदेवे शेतकरी प्रतिनिधी श्री आप्पासाहेब गुंजकर आदींची समयोचित भाषणे झाली.
यावेळी मंचावर उपरोक्त मान्यवर तथा अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ प्रकाश कडू, सहयोगी अधिष्ठाता सर्वश्री. डॉ प्रकाश नागरे. डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. हरणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेंद्र देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा डॉ प्रदीप बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रकाश नागरे यांनी केले. प्रभात फेरीचे यशस्वी आयोजन डॉ प्रदीप बोरकर, डॉ राजेंद्र देशमुख, डॉ नितीन गुप्ता, श्री. राजीव कटारे, यांचे सह विविध महाविद्यालय अधिकारी वर्गाचे परिश्रमातून झाले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola