अकोला : दहीहंडा परिसरात कार्यरत मंडलाधिकारी हे लाचखोर असल्याने तलाठी व कोतवाल यांना लाच घेण्याची सवय लागली होती त्या सवयीमुळे त्यांनी तक्रारदार ट्रॅक्टर मालक यांना रेती वाहतूक करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी 40 हजार रुपये ची लाच मागितली होती ती लाच आज कोतवाल यांचे मार्फत स्वीकारण्यात आली असता अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व त्यात कोतवाल, तलाठी व मंडलाधिकारी सहजपणे अडकले
आरोपी:
१.निळकंठ परशुराम नेमाळे,वय ५१ वर्षे, पद-मंडल अधिकारी,वर्ग -३ नेमणूक – दहीहंडा मंडल, तहसील -अकोला.,
२.भारत श्रीकृष्ण ढोरे,वय ४०वर्षे,पद-तलाठी वर्ग-३, नेमणूक- खांबोरा,तहसील – अकोला.
३.सतीश केशव पाठक, वय ५९ वर्षे,पद-कोतवाल वर्ग-४,नेमणूक-खांबोरा,तहसील-अकोला. या
तिघांना आज दि.२२/१०/१८ रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली.२२/१०/२०१८ रोजी
तक्रारदाराचा ट्रॅक्टर असून तक्रादार शेती व रेतीचा व्यवसाय करतो.रेतीचा व्यवसाय करणेकरिता ,त्याचा ट्रॅक्टर पकडून कारवाई न करणे करीता आरोपी क्र.१ व २ यांनी तक्रारकर्त्याकडे ४०००० (चाळीस हजार) ची लाच मागितली व यातील आरोपी क्र.२ याने आरोपी क्र.३ याचे मार्फत स्वीकारली.
लाचेची रक्कम ४०००० आरोपी क्र.३ कडून जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई संजय गोर्ले,पोलीस उप अधीक्षक,ईश्वर चव्हाण,पोलीस निरीक्षक,पोहवा गजानन दामोदर,काळे,पोना सुनील राऊत, पोशि संतोष दहिहंडे, सुनील येलोने, राहुल इंगळे, चालक कैलास खडसे, प्रवीण कश्यप,सर्व लाप्रवि, अकोला यांनी श्रीकांत धिवरे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि,अमरावती परिक्षेत्र, श्रीमती चेतना तिडके,अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि,अमरावरी परिक्षेत्र.यांचे मार्गदर्शनात केली आहे. आरोपी क्र.१,२ व ३ ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola