शिर्डी : शिर्डीमध्ये आजची सकाळ एक धक्कादायक घटना घडली अकोले तालुक्याती चास गावातील एकाच कुटुंबात तिघांनी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बातमीने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे नवरा, बायकोने 2 वर्षाच्या चिमुरडीलाही गळफास लावून आत्महत्या केली आहे. अवघ्या 2 वर्षाच्या चिमुरडीला गळफास लावताना या माता-पित्यांचं हात सरसावलेच कसे असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
पांडूरंग राधू शेळके वय 31 तर पत्नी सोनाली शेळके वय 22 असं या जोडप्याचं नाव आहे. या दोघांनी त्यांची मुलगी शिवन्यासह स्वत:लाही गळफास लावून घेतला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.पांडूरंग यांचे मित्र रात्री त्यांच्या घरी दूध आणण्यासाठी गेले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. ते घरात गेले आणि त्यांनी या तिघांचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिले. यानंतर याबद्दल पोलिसांना सांगण्यात आलं.
घटनेती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवले आहेत. तर शेळके दांपत्याने असं टोकाचं पाऊल का उचललं याचा आता पोलीस तपास घेत आहे.
अधिक वाचा : अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची सांत्वनपर मदत द्या – रामदास आठवले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola