रावण दहनाचा कार्यक्रम बघत असलेल्या लोकांच्या गर्दीवर भरधाव ट्रेन आल्याने या रेल्वेखाली 60 हुन अधिक लोक ठार झाल्याची आणि शंभरहुन अधिक जण जखमी झाले असल्याची अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसर मध्ये घडली आहे. हा रेल्वे रुळांवर झालेला सर्वात मोठं अपघात असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची तथा या अपघाततील मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित देण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.
अमृतसर मधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद घटना आहे. मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे. रावण दहन चा कार्यक्रम रेल्वे रुळांजवळ कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला . फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वे रुळांवर उपस्थित बघ्यांच्या गर्दीला रेल्वेचा आवाज आला नाही.त्यात शंभरहून अधिक जखमी आणि 60 हुन अधिक जण मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे.या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
अधिक वाचा : अहमदनगर – पुणे मार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola