अकोट: अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यात दृष्काळ स्थिती असुन अकोट तालुका वगळल्याने नेमकी शेतातील पीक स्थितीची पाहणी पालकमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांनी 21 आॅक्टोबर रोजी केली. यावेळी नेव्होरी, पिपळखुटा, तांदुळवाडी सह अनेक गावातील शेतात जाऊन पीक पाहणी केली. शेतामध्ये सोयाबीनच्या शेंगा कमी उत्पादन व चपटा दाणे आढळली. शिवाय कपाशीची बोंड काळी पडली.पराटीची झाडे फुलासह बोंड न फुटता मातीमोल झाल्याची शेतात दिसुन आले. बाष्पीभवन कमी झाले, पाऊस कमी पडला, शेतातील पीकाचे चांगले उत्पादन झाले नाही. उलट जमीनाला पडलेल्या भेगा पाडल्याने शेतात तग धरून असलेल्या पीकांची स्थिती बिकट असल्याचे आढळले. यावेळी शेतकरीसह शेतमजुरांनी पीकाचे कमी व दर्जाहीन उत्पादनाची सविस्तर माहीती पालकमंत्री डाॅ. पाटील यांना दिली.यावेळी पालकमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांनी तात्काळ सव्हॅ करायच्या सुचना दिल्या.
अकोट तालुक्याला सुध्दा दृष्काळ सदृष्श मदतीचा लाभ मिळावा याकरीता मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस सोबत बोलणार असुन प्रत्यक्ष पाहणी अहवाल देणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांचे सोबत माजी आमदार वसंतराव खोटरे, आकोट तहसिलदार विश्वनाथ घुगे, शिवसेना उपजिल्हा प्रमूख दिलीप बोचे ,डॉ अरविंद लांडे, डॉ गजानन म्हल्ले, तहसिलदार विश्वनाथ घुगे मंडळ अधिकारी प्रशांत सायरे, मंडळ अधिकारी कुटासा देशमुख, तलाठी गोपाल वानरे, तलाठी दिनेश मोहोकार तसेच नेव्होरीचे सरपंच गोपाल वसु, बेलुराचे सरपंच राम मंगळे,सोपान साबळे, बडेनांदू ,लोखंडे ,मयूर, आसरकर ,मयूर नाठे, उमेश अडउ, रवींद्र मालखेडे, गोपाल बोकसे ,राजू शेंडके,चंदू भरबदे, शाम पटके,अनिल लावणे यांची उपस्थिती होती.
दरम्यान पालकमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांनी स्व.हभप जगन्नाथ महाराज वसू नेव्होरी तसेच माजी नगराध्यक्ष स्व भाउराव अंबडकार यांच्या घरी भेट देऊन कुंटुबाची सांत्वना केली.
अधिक वाचा : अकोट दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मुस्लिमाचा सक्रीय सहभाग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola