पातूर (सुनील गाडगे):- पातूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भिम सेना सामाजीक संघटना पातुर कडून भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. ही मिरवणूक समता नगर येथून सुरू होऊन बायपास चौक, जुने बस स्टँड येथून होऊन मिलिंद नगर येथे येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत संपूर्ण पातूर तालुक्यातील भीमसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरात सर्वत्र जयभिमचा गजर ऐकावयास मिळत होता.
शहर हे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बॅनर च्या शुभेच्छांनी सजले होते. शहरातील प्रमुख मार्गांवर निळे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या होत्या. अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने ही मिरवणूक प्रस्थान करीत होती. या मिरवणुकीत विविध आखाडे, लेझीम पथके सहभागी झाले होते. यावेळी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख व पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. डी. सी. खंडेराव यांनी मिरवणूक मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या मिरवणुकीच्या समारोपात भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.निर्भयदादा पोहरे, अध्यक्ष जितू सिरसाट यांनी समस्त नागरिक व पोलीस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते मा. राजेंद्रजी पातोडे हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे इद्दु पहेलवान, नईम भाई, महेताब पहेलवान, भीमसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : पातुर नगर परिषद चा झोपाळु कारभार, मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola