भांबेरी (योगेश नायकवाडे) : भांबेरी मार्गे अकोला बससेवा गेल्या काही महिन्यापासून बंद होती आता पंधरा दिवसापासून सुरु तर झाली पण एकही बस चालेल अशा अवस्थेमध्ये नाहीत कोणती बस केव्हा कुठे बंद पडेल याचा काही नेम नाही आणि बस चे टायर पाहता केव्हा अपघात होईल सांगता येत नाही. तेल्हारा आगार मधील ज्या बसेस बिनकामी समजल्या जातात त्याच बसेस भांबेरी मार्गे अकोला पाठवल्या जातात बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना बसेस ची वाट बघून बघून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो, आणि एसटी पास काढूनही कामात पडत नाही कारण बस चालण्याच्या स्थिती मध्ये नसतात त्यामुळे नेहमी उशिरा चालतात तसेच बऱ्याचदा तर अशी परिस्थिती होते की गावातून बाहेर गेल्या वर गाडी बंद पडते आणि विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यास उशीर होते. तसीच परिस्थिती आज भांबेरी मार्गे तेल्हारा जाणारी १०.३० ची बस भांबेरी मध्ये बंद पडली होती.तर चालू करण्याकरिता स्वतः कंडक्टरला धक्का द्यावा लागला व बस सुरु करण्यास मदत करावी लागली. तरी एसटी महामंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे कारण विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये तसेच कोणत्याही प्रकारच अपघात होऊ नये.अशी मागणी सर्व विद्यार्थी वर्ग तसेच गावातील नागरिक करत आहेत.
अधिक वाचा : उद्या अकोल्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola